*_... परिपाठाचे सुत्रसंचलन -2 ...*_
सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम्
फुल फुलत आहे, कळी उमलत आहे .
अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे .
सागराला साथ असते पाण्याची
बागेला शोभा असते फुलांची
तसेच
आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची ,
माझे नाव ..................... मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.
सु म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे .................
आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते , म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे ...................
आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे ......................
आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे ......................
उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते ,
अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे ...................
प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.
वरील प्रमाणे आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ घेतो
.धन्यवाद
No comments:
Post a Comment