Saturday, 31 July 2021

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

 


Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day) साजरा केला जातो. मात्र या फ्रेंडशिप डे (Friendship Day) ची सुरुवात नेमकी कशी, कुठे आणि का झाली याची माहिती फार कमी लोकांना आहे.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात मैत्रीच्या नात्याची जागा फार खास असते. मैत्रीचं नातं हे जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक मानलं जातं. जर तुमच्या आयुष्यात मित्र नसेल, तर तुमचे आयुष्य व्यर्थ आहे असेही समजले जाते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ (Friendship Day) साजरा केला जातो. मात्र या फ्रेंडशिप डे (Friendship Day) ची सुरुवात नेमकी कशी, कुठे आणि का झाली याची माहिती फार कमी लोकांना आहे.
भारतात दरवर्षी ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. म्हणजेच भारतात आज फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने अनेक मित्र मैत्रिणी भेटतात, पार्टी करतात, पिकनिक प्लॅन करुन मैत्रीच्या दिवसाचं धुमधडाक्यात सेलिब्रेशन करतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या युगात फ्रेंडशिप डे चं महत्त्व फार वाढलं आहे.
भारतात फ्रेंडशिप डे चा ट्रेंड काही वर्षांपूर्वी सुरु झाला असला, तरी याचा इतिहास त्यामानाने फार जुना आहे. भारतात फ्रेंडशिप डे सुरु होण्यापूर्वी दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेत 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी मित्र मैत्रिणींना ग्रिटिंग कार्ड देत हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’

जगभरात विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या मान्य करण्यात आला.

पण भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तर अमेरिकेतील ओहायोमधील ओर्बलिनमध्ये 8 एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डे च्या काही रंजक गोष्टी

फ्रेंडशिप डे ची सुरुवात ही जगातील सर्वात मोठ्या युद्धात दडली आहे. असं म्हटलं जाते की, पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये आपपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाच्या भावना निर्माण झाली. ही भावना संपवण्यासाठी 1935 मध्ये अमेरिकेच्या सरकारने फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल असे ठरवण्यात आले. या मागचे प्रमुख कारण म्हणजे रविवारी बहुतांश लोकांना सुट्टी असते. त्यामुळे लोक एकत्रित येऊन हा दिवस साजरा करु शकतात.

तर दुसरीकडे असे म्हटले जाते की, 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्याच्या मित्राने त्याच्या आठवणीत आत्महत्या केली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला. त्या निर्दोष व्यक्तीचा जीन घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल 21 वर्षांनी 1958 मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला.

त्याशिवाय 1930 मध्ये एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली. जोएस हाल असे या व्यापाराचे नाव आहे. जगभरातील सर्व लोकांप्रमाणे मित्रांसाठीही एक खास दिवस असावा या कारणाने या व्यापाराने फ्रेंडशिप डेची सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यापाऱ्याने 2 ऑगस्ट  हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून निवडला. त्यानंतर युरोप आणि आशिया यासारख्या बहुतांश देशात या परंपरेला पुढे नेत फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

तसेच दक्षिण अमेरिकेतील पेराग्वेमधील डॉक्टर रमन आर्टिमियो यांनी 20 जुलै 1958 रोजी एका डिनर पार्टीदरम्यान मित्रांसाठी खास दिवस असावा अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर फ्रेंडशिप डे ची सुरुवात झाली. तसेच ही परंपरा कायम रहावी याचीही काळजी घेण्यात आली.

पाश्चिमात्य देशांमध्येच ‘फ्रेंडशिप डे’ चा पायंडा

दरम्यान फ्रेंडशिपचा इतिहास पाहता व्हॅलेटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, चॉकलेट डे या सारख्या दिवसांप्रमाणे फ्रेंडशिप डे चा पायांडा पाश्चिमात्य देशांमध्ये रुजवण्यात आला. ग्रिटिंग कार्ड, सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देतात आणि आयुष्यभर मैत्री निभवण्याचं वचन घेतात.

*‼️  मैत्री  ‼️*


तिला इयत्ता नसते, तिला तुकडी नसते.

जिला वर्ग नसतो, *ती कायम मैत्री असते.*


तिला जात नसते, तिला पात नसते.

जिला धर्म नसतो, *ती कायम मैत्री असते.*


तिला जीत नसते, तिला हार नसते.

जिला व्यवहार नसतो, *ती कायम मैत्री असते.*


तिला मोज नसते, तिला माप नसते.

तिला गर्व नसतो, *ती कायम मैत्री असते.*


तिला रूप नसते, तिला रंग नसते.

ती सुंदर असते, *कारण ती खरी मैत्री असते.*


🤝🏻 *मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!* 🤝🏻🤝🤝

Thursday, 27 May 2021

उन्हाळ्याच्या सुट्टीतील मामाचे गाव झाले इतिहासजमा


 *उन्हाळी सुट्टीतील मामाचे गाव झाले इतिहास जमा* 

पूर्वी विद्यार्थ्यांना सुट्ट्या म्हणजे पर्वणीच.

 एकदाका सुट्ट्या झाल्या की मामाच्या गावाला जायचे. काय खेळायचे, धमाल करायचे याचे आराखडे बांधले जायचे. या खेळामुळे नवीन मित्र-मैत्रिणी व्हायचे. पण आता उन्हाळी तसेच संगणक मोबाईल टीव्ही मुळे सुट्ट्यातील मामाचे गाव इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी शहरातील मुलांना खेड्यात जायचे म्हटले की धमाल असायची, वर्षभर शहरात राहणारी मुलं गावाकडे आले की  झाडावर चढणे, आंबे, जांभूळ, करवंदाचा आस्वाद घेणे, हे ठरलेलंच असायचं. दुपारच्या तसेच रात्रीच्या एकत्र जेवणाच्या पंगती पुन्हा अंगणात आजी-आजोबांसोबत अंगणात बसून गोष्टी ऐकायच्या. पण आता आजी आजोबा मामा मामी हेच एकत्र नाही. ग्रामीण भागातील एकत्र कुटुंब पद्धती आता विभक्त झाली आहे. तसेच गावातील पाणीटंचाई विद्युत लोडशेडिंग झाडांची झालेली तोड अश्या गोष्टींचाही परिणाम मामाच्या गावाला झाला आहे आता शहरी व ग्रामीण भागातील मुलांनाही उन्हाळी वर्ग, संगणक, अभ्यास, टीव्ही, मोबाईल गेम यामध्येच अधिक गुंतवून ठेवले जाते. त्यामुळे मुलांनाही आता मामाचे गाव नकोसे झाले आहे. आजी आजोबांच्या गोष्टीतही त्यांना आता रस राहिलेला नाही तर आधुनिक आजी आजोबा आपल्या नातवांना मोबाईल गेम लोड करून देताना दिसत आहेत. पूर्वी दोन दोन महिन्याच्या सुट्ट्या मामाच्या गावी घालणारी मुले आता दोन दिवसाची प्रेक्षणीय स्थळांची टूर काढून उन्हाळी सुट्टी साजरी करत आहेत.

 *विशेष लेख* 

 *प्रा.आर.बी.अंभोरे विद्यानिकेतन हायस्कूल सिडको औरंगाबाद*

*तथा*

 *युवक राज्य संघटक महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन*

Wednesday, 11 November 2020

वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

 https://youtu.be/4dUXOwdDLdc

वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

*जाणून घेऊयात वसुबारस विषयी*

आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. 

काय आहे यामागील कथा

अशी कथा आहे की समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनांपुरतीसाठी ही पूजा केली जाते.

तसेच असे म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. ह्या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.

आपला देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. पाहू कसा साजरा केला जातो हा दिवस

असा साजरा करावा हा सण

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. 

ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.

गायीच्या पायावर पाणी टाकावे.

गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.

वासराची अश्यारिती पूजा करावी.

निरांजनाने ओवाळून घ्यावे.

गायीच्या अंगाला स्पर्श करावे.

गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.

नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.

जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.

या दिवसाचे काही नियम

स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.

ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.

स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.

या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. 

या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.

आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्‍या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात.

त्यामुळे वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

*प्रा.रवि अंभोरे पाटील*

*विद्यानिकेतन हायस्कूल सिडको औरंगाबाद*

Sunday, 11 October 2020

*पत्रकारांवर प्रेम करुन पहा*✍️✍️

 *पत्रकारांवर प्रेम करुन पहा*✍️✍️


एकाद्या तरी पत्रकारावर


प्रेम करुन पहा।


मनापासुन त्याच्यावर


तुम्ही विस्वास ठेवुन पहा।।


 


         जीवाला जीव देईल 


         त्याच्या पेनाची ताकत तुम्ही पहा।


         त्याचं सारखे सामजीक कार्य 


         एकदातरी करुन पहा।।


 


कसा जगतो एकटा


त्याच्या मनात चोरून पहा।


प्रेमाचे दोन शब्द बोलणारा पत्रकार


त्यांच्याशी शोधून तर पहा।।


लेकरा बाळांना सोडून, अर्ध्या रात्री बे रात्री बातमी करीता वणवण फिरत जातो कसा,, याचा अनुभव एकदा घेऊन तर पहा।।


         त्याच्या काळजाच्या यातना


         एकदा तरी अनुभवून पहा।


        अशा त्याच्या वैतागलेल्या जगात तुम्ही


         त्याच्या एकदा रमून तर पहा।।


 


दु:ख असुन मनात दुसऱ्या ला आधार घेऊन सोबत घेऊन चालनारा पत्रकार यांच्या सोबत तुम्ही एकदा तरी राहुन पहा 


 


जनतेच्या व शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या दरबारात मांडणारा पत्रकार यांच्या विषयी एकदा तरी


तुम्ही सर्वांशी हसुन पहा।


त्यांच्या सारखे तुम्ही


साहेबा समोर ऊभे राहुन पहा।।


 


         एकदा तरी त्यांच्या पाठीवर 


         थाप मारून पहा।


         रोज मरतो सर्वांन साठी


         एकदातरी त्याच्या साठी जगून पहा।।


         


एकदा तरी पत्रकार बांधवावर


तुम्ही प्रेम करुनपहा…                 


🙏 *माझ्या सर्व पत्रकार 🙏🏽 बांधवांना समर्पित

*✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

*आपलाच -संपादक प्रा.रवि अंभोरे  शोर्य मराठी न्यूज नेटवर्क*

Thursday, 1 October 2020

गांधीजिंच्या स्वप्नातला भारत*

 

*गांधीजिंच्या स्वप्नातला भारत*                                -------------------------------------                  भारत आज प्रत्येक क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या प्रमुख देशातील एकमेव स्पर्धक देश म्हणून जगात *भारताची* ओळख आहे. औद्योगिक क्षेत्रा पासुन ते  क्रिडा क्षेत्रापर्यत भारताने जगात आपली मान उंचवलेली आहेत, अलीकडे तर संरक्षण क्षेत्रातील देखील अत्याधुनिक शस्रे खरेदीच्या माध्यमातून स्वतः चे संरक्षण करण्याचे सामर्थ्य  असल्यानचे सिध्द झाले, त्याच बरोबर  संरक्षण क्षेत्रातील  यशस्वी अणु चाचण्याने जगात भारताचे प्राबल्य अधिक वाढल्याने," *हम भी किसिके कम नही"*  याचा भारताने जगाला संदेश दिला. हि प्रत्येक भारतीया साठी अभिमानाची बाब आहे. 1962 साली भारतावर चिन ने युध्द छेडले  अपुर्ण सैन्य आणि संरक्षण सामुग्री  परिणामातुन भारताला हार खावी लागली, यावर  राष्ट्र पिता महात्मा गांधीनी आपले विचार प्रकट केले "भारताला भविष्यात बलशाही बनवायचे असेल तर देश स्वयंपूर्ण असावा त्या साठी *स्वदेशीचा नारा*" हा मंत्र  प्रत्येक भारतीयांनी अंगिकारला हवा " असे त्यांचे मत होते. आज त्यांच्याच विचारातून आज देशाचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदींनी अलीकडेच  Make in india मेक इंन इंडिया या माध्यमातून स्वदेशीचा नारा लावला. भारतात बनवा आणि  विका  या परिणामातुन  देश स्वयंपुर्ण होत आहेत, याचा लाभ अनेक स्थानिक उद्योजकांना मिळाला. आणि मिळत आहे...  आज म. गांधीच्या या विचाराच्या मंत्रा नेच आज देशाला बळकटी आली,  परिणामी आज भारताला प्रगत राष्ट्राच्या पंगतीत स्थान मिळाले,  स्थानिक उत्पादक आणि त्याचे उत्पादनाने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, देशातील बेरोजगार संख्या कमी होऊन  देशातील अर्थ व्यवस्था मजबूत होत आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासातुनच आज आपण शेजारच्या  दु:मन राष्ट्र चिन शी सामना युध्द/ करण्यास आपल्यात सामर्थ्य आहेत, मोदी जींनी  म. गांधीजीचे विचार आमलात आणून आज भारत देशाची दिसणारी भरभराट हिच आपल्या राष्ट्राची आज खरी प्रगती आहे        ..... प्रा. रवि अंभोरे औरंगाबाद                  ( *आज महात्मा गांधीजी यांच्या 151 जयंती निमित्ताने*)

Sunday, 2 August 2020

*ԋαρρყ ϝɾιҽɳԃʂԋιρ ԃαყ..*

*मैत्री...!* 📝
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

▫️ *मैत्री साजरी करायला*
*एक दिवस पुरेसा नाही..*
*संपूर्ण आयुष्य सरले तरी,*
*कित्येकांना मैत्री कळालीच नाही..*

▫️ *मैत्री म्हणजे,*
*निरंतर प्रेम तर कधी क्षणिक राग आहे*
*निरपेक्ष मन आणि जिवाभावाची साथ आहे..*

▫️ *मैत्री म्हणजे*
*कधी आपुलकी तर कधी दरारा आहे*
*कधी सहवास तर कधी जिव्हाळा आहे..*

▫️ *ज्यांना कळली नाही मैत्री*
*त्यांचं जीवनच व्यर्थ आहे.*
*अन ज्यांना समजली मैत्री,*
*त्यांच्यासाठी धर्तीवरच स्वर्ग आहे..*
*ԋαρρყ ϝɾιҽɳԃʂԋιρ ԃαყ..*

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

*प्रा. रवि अंभोरे*
*शोर्य मराठी न्यूज प्रतीनिधी औरंगाबाद *  ✍️

Wednesday, 29 July 2020

👉नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यावसायिक शिक्षणावर जोर,* *👉१०वी-१२वीचं महत्त्व कमी होणार*

*👉नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यावसायिक शिक्षणावर जोर,*
*👉१०वी-१२वीचं महत्त्व कमी होणार*
®️🔰®️🔰®️🔰®️🔰®️🔰
*नवी दिल्ली, २९ जुलै :- महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्याच दिवशी दिल्लीत मोदी सरकारने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचं घोषित केलं आहे. यापुढे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा नसेल किंवा फारशी महत्त्वाची नसेल, असंच या शिक्षण सुधारणा धोरणातून स्पष्ट होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.*

*गेली अनेक वर्षं अस्तित्वात असेलेली 10+2 म्हणजे दहावीपर्यंत शालेय आणि बारावीपर्यंत उच्च माध्यमिक वर्ग अशी रचना आता नसेल. त्याऐवजी 5 3 3 4 अशी नवी रचना अस्तित्वात येणार आहे. याचा अर्थ पहिली पाच वर्षं प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक वर्ग, त्यानंतर प्राथमिक शिक्षण आणि पुढची तीन वर्षं माध्यमिक वर्ग अशी रचना असेल. शेवटची तीन वर्षं उच्च माध्यमिक वर्गाचं शिक्षण असेल.*

*“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं तिहेरी रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे. विद्यार्थी स्वत:चं मूल्यांकन करणार, याशिवाय त्याचे मित्रही आणि शिक्षकही मूल्यांकन करणार. याशिवाय शाळेतून बाहेर पडताना विद्यार्थ्याला किमान एक व्यावसायिक कौशल्य प्राप्त व्हायला हवं असं शिक्षण देणार असल्याची माहिती,” यावेळी देण्यात आली.*

*देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं असून त्यात अनेक अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे गेल्या ३४ वर्षात शिक्षण धोरणात कोणताही बदल झाला नव्हता. नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी करण्यात आलं आहे. तसंच इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाणार आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल पत्रकार परिषदेत उपस्थित होते.*

*👉पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे;*

➖देशातील प्रमुख आठ भाषांमध्ये ई-कोर्सेस विकसित करणार

➖एम फीलची डिग्री कायमची बंद होणार

➖व्यावसायिक आणि शैक्षणिक आणि अभ्यासक्रम आणि अतिरिक्त-अभ्यासक्रम यांच्यातील सर्व विभक्तता दूर केली जाणार

➖उच्च शिक्षणासाठी एकच नियामक संस्था असणार

➖खासगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थांना समान नियम लागू होणार

➖पाचवीपर्यंत मातृभाषा शिक्षणाचं माध्यम

➖बोर्ड परीक्षांचं महत्त्व कमी करुन पाठांतराऐवजी ज्ञानाला प्राधान्य दिलं जाणार

➖रिपोर्ट कार्डमध्ये फक्त मार्क आणि शेरे दिले जाणार नसून त्यामध्ये कौशल्ये आणि क्षमतांचाही विचार केला जाणार

➖शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वयोमर्यादेत वाढ

➖विद्यार्थी एकत्रितपणे दोन शाखांचा अभ्यास करु शकतात

➖कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार

➖शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण, कायदा शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणही याच कक्षेत आणलं गेलं आहे

➖दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती

➖राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची शिफार,

➖खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याचीही शिफारस

➖सेमिस्टर पॅटर्नवर असणार भर

®️🔰💐💐5 वी, 8 वी, 11 वी अणि पदवी याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 💐💐

Saturday, 18 July 2020

💐 *HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती पाठवत आहे कृपया लाभ घ्या* 💐

💐 *HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती पाठवत आहे कृपया लाभ घ्या* 💐
-----------------------------------------------------------
 *मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
-----------------------------------------------------------
1) *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
---------------------------------------------------------
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.
-----------------------------------------------------------
👉 *इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
----------------------------------------------------------
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) MHT-CET* पत्र
3) MHT-CET* मार्क  लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 ) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते                                         13) फोटो.
---------------------------------------------------------
*मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*
----------------------------------------------------------
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
----------------------------------------------------------
           *वैद्यकीय क्षेत्र*
---------------------------------------------------------
*शिक्षण - एमबीबीएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------------
*उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*
-----------------------------------------------------------
*शिक्षण - बीएएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------------
*पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*
----------------------------------------------------------
*शिक्षण - बीएचएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------------
*पुढील उच्च शिक्षण - एमडी*
---------------------------------------------------------
*शिक्षण - बीयूएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.
-----------------------------------------------------------
*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*
---------------------------------------------------------
*शिक्षण - बीडीएस*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
-----------------------------------------------------------
*पुढील उच्च शिक्षण - एमडीएस*
----------------------------------------------------------
*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .
-----------------------------------------------------------
*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*
-----------------------------------------------------------
*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
-----------------------------------------------------------
         *शिक्षण - डिफार्म*
---------------------------------------------------------
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.
----------------------------------------------------------
*पुढील उच्च शिक्षण - बीफार्म*
--------------------------------------------------------
*शिक्षण - बीफार्म*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
---------------------------------------------------------
  *संरक्षण दलांत प्रवेशासाठी*
--------------------------------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
-----------------------------------------------------
*अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल*
 ----------------------------------------------------------
*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
*शिक्षण - बीई*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
*शिक्षण - बीटेक*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण
---------------------------------------------------------
    *कॉम्प्युटरमधील कोर्सेस*
----------------------------------------------------------
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
----------------------------------------------------------
         *शिक्षण - बारावी*
 -----------------------------------------------------------
*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन*
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
-----------------------------------------------------------
     *रोजगाराभिमुख कोर्सेस*
 ----------------------------------------------------------
*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर
*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस
कालावधी - तीन वर्षे
-----------------------------------------------------
*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*
 ---------------------------------------------------------
*टूरिस्ट गाइड*
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे.
----------------------------------------------------------
        *बांधकाम व्यवसाय*
 ----------------------------------------------------------
*शिक्षण - बीआर्च*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NATA , JEE
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक 
--------------------------------------------------------
        *पारंपरिक कोर्सेस* ---------------------------------------------------------
*शिक्षण - बीएससी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.
---------------------------------------------------------
*शिक्षण - बीएससी(Agri)*
कालावधी - 4 वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
---------------------------------------------------------
*शिक्षण - बीए*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
--------------------------------------------------------
*शिक्षण - बीकॉम*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
-------------------------------------------------------
*शिक्षण - बीएसएल*
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
--------------------------------------------------------
*शिक्षण - डीएड*
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्‍यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
------------------------------------------------------
*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए 

-------------------------------------------------------
*फॉरेन लॅंग्वेज*
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
------------------------------------------------------
*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.*
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.
उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.

अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.

अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.

इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.

काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.
×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×

*काही महत्त्वाची संकेतस्थळे*
1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in

2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org

3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in

4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in

5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in

6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in

7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in

Wednesday, 1 July 2020

*स्वतः ची किंमत*

*❂ बोधकथा ❂*

 *स्वतः ची किंमत*
एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला, "आयुष्याची खरी  किंमत काय असते हो?"
आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले "ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये, विकू नकोस ." सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली.
तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला - "या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. "
पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत
जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दशलक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता. त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे
अख्खे दुकान जरी विकले तरीसुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार."
आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्थितीत तो आजोबांकडे परतला.
त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरीसुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.
स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोणत्याही निरर्थक तुलनेमध्ये गुंतू नका. 
*तात्पर्य  : मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहे.*
*तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे.*

Monday, 29 June 2020

वेळेचे महत्व.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...
आज मराठी निबंध वेळेचे महत्व ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आहे.
वेळेवर हा मराठी निबंध तुम्हाला वेळेचे महत्व पटून देईल.
तर वेळ वाया न घालवता निबंधांला सुरवात करूया.
    वेळेचे महत्व.
वेळ हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
वेळ हा कोणासाठी हि थांबत नाही तो निरंतर चालत राहतो
म्हणून तर तुम्ही किती कष्ट करून किती मोठे झालात ते पक्त वेळेच्या माध्यमावर ठरवले जाते.
हे आपल संपूर्ण जग वेळेचे गुलाम आहे, ते वेळेबरोबरच चालते.
तुम्ही कुठे हि कामाला जा तुम्ही काम तर खूप करणार...
पण तुम्हाला मान-धन वेळे अनुसारच मिळणार. मोठ्यातील मोठी कंपनी असो कि गावतले छोटे दुकान
सर्व वेळे अनुसारच चालतात म्हणून तर सांगतात ना वेळ हि संपत्ती आहे.
गेलेले पैसे परत मिळवता येतात, न आवडणारी नोकरी सोडता येते पण वेळेचे तसे नाही गेलेला वेळ परत कधीच परत येत नाही,
आणि वेळ कधी कोणाच्या मर्जी अनुसार हि चालत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य परिश्रम केले तर
तुम्हला कष्टाचे योग्य फळ मिळनाराच.
हे सर्व वेळेचे महत्व सर्व थोर लोक जानतात
म्हणूनच तर आपली शाळा वेळे अनुसार चालते आपण वेळेवर अभ्यास केला तर आपल्यांना चांगले गुण मिळतात.
शाळाच नाही तर रेल्वे स्टेशनवर आपण पाहिले असेलच ट्रेन वेळेवर धावतात आणि ट्रेन कोणा साठी हि क्षनभर हि थांबत नाही
वेळ चुकली तर समजा ट्रेन चुकली.
वेळेचे आपल्या आयुष्या मधे खूप महत्वाचे स्थान आहे.
आज जे जे जगात थोर लोक आहेत ते सर्वच वेळेचे पालन करतात
आणि आपली कामे वेळेवरच करतात.
ह्या एक सवइ मुळेच ते इतके यशसस्वी झाले आहेत.
आपण आज पासून नाही तर याच क्षनापासूनच वेळेचे पालन करने सुरु केले पाहिजे.
आपल्या सर्व कामाचे वेळापत्रक तयार करून ते नियोजीत पणाने पूर्ण केली पाहिजे
तरच आपण आपल्या जीवनाचे स्वार्थक करू. अपयशी माणूस नेहमी आपला वेळ फालतू गोष्टी मधे वाया घालवतो,
म्हणून त्यला कधीच यश मिळत नाही.
आता पासून आपण वेळेचे योग्य पालन करूया आणि यशाचे हे शिखर गाठूया.
समाप्त.
तर मित्रांनो तुम्ही तुमची कामे वेळेवर करतात का ? 
comment करून सांगा.
तसेच हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
आपल्याला हा निबंध कसा वाटला, आणि तुम्हाला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर खाली comment करून सांगा.

Monday, 11 May 2020

*गावाकडच्या पालकास पत्र....*

*गावाकडच्या पालकास पत्र....*

 प्रिय पालक हो...

तुमच्या मुलाच्या  गुरुजींचा सप्रेम नमस्कार....🙏

        पत्र लिहिण्यास कारण की,  यंदा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुलं शाळेपासून आणि आमच्यापासून दूर झाली. एरवी मे महिन्याची सुट्टी,  दिवाळीची सुट्टी म्हटलं की मुलांना पर्वणीच असायची. स्वैरपणे,  आनंदाने सगळी सुट्टी संपत आली की पुन्हा त्यांना शाळेची ओढ लागायची. हे असच काहीसं आमच्या- तुमच्या लहानपणापासून परंपरागत चालत आलेल्या चक्र... या कालचक्राला *कोरोना*  नावाच्या महाभयंकर राक्षसाने खोडा घातला. सबंध जगभरातील क्षणाक्षणावर स्वतःचे भीतीचे सावट लादले. त्याला कोणीच अपवाद राहिले नाही.मग त्याला ही *कोवळी मनं*  तरी कसे अपवाद ठरणार?  त्यांच्या बालमनाला सुद्धा आजूबाजूचे ऐकून- पाहून अनेक प्रश्न पडत असणार हे निश्चितच. तुम्हालाही तुमच्या मुलाच्या भवितव्याची,  शिक्षणाची चिंता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच हे पत्र लिहुन आपल्याशी बोलावं,  मोकळं व्हावं असं वाटलं.

यंदाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सर्वच मुलांना पास झाल्याचे आणि पुढील वर्गात प्रवेश केल्याचं तुम्ही ऐकला असेल. तरीही तुमचा पाल्य पुढच्या वर्गात जाण्यासाठी पात्र झाला आहे हे आम्ही कळवणे हे आमचे कर्तव्यच. त्यामुळे त्याच्या पास-नापास चिंता सोडून द्या.तो  आता पुढच्या वर्गात जाणार, पण आता पुढे काय?  याबाबत आपण बोलूया.....

 गेले महिनाभर आपण आणि , मुले, कुटुंबीय सगळेजण घरीच आहोत. एरवी सतत कामात असणारे,  बाहेर फिरणारे आपण  आज या महा संकटामुळे बंदिस्त झालेले आहेत. तुम्हाला कंटाळा येणे स्वाभाविकच आहे. तुम्ही कंटाळला  असेल तशी मुलही  कंटाळले असतील. तुमच्यासमोर सुद्धा दैनंदिन जीवनाचे अनेक प्रश्न समोर असतील. तुमच्यासमोर सुद्धा अनेक समस्या समस्या निर्माण झाले असतील. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे,  समस्यांची सोडवणूक परिस्थितीनुसार होत जाईल. पण कधी?  केव्हा?  हे निश्चित सांगता येणार नाही. असो आता तर मुलांच्या सुट्ट्यांच्या वेळेचा काय याबाबत आपण बोलूया..

*खरं तर शाळा बंद म्हणजे शिक्षण बंद* हा समज पहिला दूर करूया. मुलं शाळेतच  शिकतात असं नाही. घर,  कुटुंब,  समाज, परिसर यातूनही त्याचे शिक्षण होत असतं, पण ह्यातून त्याने जे घेतलेलं शिक्षण आहे त्या शिक्षणाला विधायक मार्गातून पुढे मार्गस्थ होण्यासाठी शाळा गुरुजन प्रयत्न करत असतात. आज आम्ही त्यांच्या पासून दूर आहोत. सध्या चालू असलेला लॉक डाऊन   मुळे संपर्क होणे शक्य नसलं तरी व्हाट्सअप च्या माध्यमातून मुलांच्या चाचण्या घ्या, उजळण्या  घ्या, स्वाध्याय घ्या अभ्यास या असाही विचार पुढे आला आहे.. चालू आहे. बऱ्याच  ठिकाणी सुरू असेल यावर बोलत बसण्यापेक्षा *आपण* आपल्या  मुलांच्या साठी काय करू शकतो?  याठिकाणी हा उपाय तांत्रिक कारणाने तकलादू  ठरेल तेव्हा काय करायचं याबद्दल आपण बोलूया......

आज घरी असणाऱ्या मुलाचे तुम्ही *केवळ पालक नसून गुरुजी व्हा*  असच काहीसं आव्हान मला आज करावस वाटतं. होय गुरुजी व्हा..... आता गुरुजी म्हणजे लेखन,  वाचन,  पाठांतर घ्या असंच  नव्हे. मुलांना मारून मुटकून अभ्यासाला बसवा हेही नव्हे..  यापलीकडेही आम्ही गुरुजीं मुलांना भरपूर काही देत असतो. त्यातलंच काहीसं  किंबहुना जास्त हे तुम्ही मुलांना देऊ शकता. पण हे करताना मुद्दामून सांगावसं वाटतंय की *त्यांच्यावर अभ्यासाचं ओझं लादू नका* मग काय करता येईल?

आता मे  नंतर मुलांची उन्हाळी सुट्टी   सुरू झालेली आहे.. ह्या  सुट्टीचा आनंद घेऊ द्या त्यांना.... बागडू द्या..... कुटुंबात लुडबुड करू द्या.... त्यांना अटकाव करू नका...  हटकू नका.... अभ्यास- अभ्यास- अभ्यास, पाठांतराचा लकडा त्यांच्यामागे लावू नका..... आता तुम्ही म्हणाल *"गुरुजी व्हा म्हणताय अन अभ्यास करायचं सांगायचं नाही"*.
असं कसं गुरुजी?    *"होय, तसेच.."*
मग काय करायचं?  लॉक डाऊन मुळे गावबंद, शहरे बंद, बाजार बंद, सगळं काही बंद आहे. कारण गल्लीत,  बाजारात,  शहरात *कोरोना*  वावरत आहे. याची काळजी घेऊनच सगळ करायचा याचं भान हे आपल्याला असलं पाहिजे.
 तुम्ही सर्वजण कुटुंबातील सदस्य सगळे घरीच आहेत ना.?  असायलाच पाहिजे.... खरंतर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जाऊच नका. *अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावं लागलं तर तोंडाला मास्क लावून जा*. वारंवार हात साबणाने स्वच्छ  धुवा..  *इथूनच खर्‍या अर्थाने मुलांच्या घरातल्या शिक्षणाची सुरुवात करा*. तुम्ही आरोग्याचे मंत्र पाळले तर मुलेही त्याचा अनुकरण करतील हळूहळू तीही शिकतील...
सकाळी उठल्यापासून सतत कामात असणारे तुम्ही, तुमचे कुटुंबीय,....  तुम्हालाही या लॉक  डाऊन मुळे थोडीशी उसंत मिळाली असेलच.... तेव्हा या वेळात मुलाकडे अधिक  लक्ष द्या... मुलांनाही घरातल्या छोट्या- छोट्या कामात  गुंतवा. त्यांच्या शरीर स्वच्छतेकडे लक्ष द्या. स्वतःच्या गोष्टी स्वतःचं करण्याची सवय लावा. अधून मधून त्यांनाही सकाळी लवकर उठवा..पहाट कशी असते?  चिमणी पाखरांची  स्वच्छंदी किलबिल  त्यांना जाणीवपूर्वक ऐकवा...  दाखवा त्याला  सूर्याचे उगवणे.. लाल बुंद सूर्यबिंब.... पशु -पक्षांचे आवाज ऐकवा...  तेही शिकतील पशु पक्षांचे आवाज काढायला.. नकला करायला... भल्या पहाटे उठून राबणारी, गोठ्यातल्या शेणा मुतात  हात घालणारी आई... हंबरणारी  वासरे... त्यांना मायेनं चालणारी गाय...  फेसाळणार दूध कसं काढलं जातं... हेही त्याला बघू द्या.. घरातल्या छोट्या मोठ्या कामात त्यालाही सहभागी करून घ्या. हलकं फुलकं  काम आनंदाने करील तोही..... *पण सक्ती नाही हं चालणार..!* घरातली  स्वच्छता,  जेवणाचं ताट स्वतःचे स्वतः धुवायला  शिकवा.. स्वतः पाणी घेऊन जेवायला बसायला  शिकवा... पण ते तुमच्या कृतीतून...  *आईलाही भरपूर काम असतात*. थोडासा आपणही तिला मदत करून  हलकं करूया,  म्हणून तिही  करतील हे आनंदाने......
*भाकरीचं  शेत* त्यांनी  पुस्तकात वाचलेय.  आता तुमच्या बरोबर त्याला आणखी शिकू द्या.. आता मिरगाची लगबग सुरू होईल.... न्या त्यालासुद्धा शेताच्या  बांधावर.... घराच्या कणगीत, तट्ट्यात, टोपल्यात  येणारे भात,  ज्वारी कसं येतं?  ते पुन्हा पुन्हा बघू दे त्याला..समजेल तोही...  उन्हाच्या झळा लागू द्या त्यालाही.... घामाच्या धारांनी  भिजुन चिंब होऊ दे त्यालाही..... त्याशिवाय *कष्टाची किंमत* त्याला तरी कशी कळणार...?  नुसती पुस्तकात वाचून? 🤔 'पाऊस कसा पडतो?' हे विचारा त्याला....... त्यानं पुस्तकात वाचलेलं, बघितलेलं, घ्या वदवून  त्याच्याकडून... *तुम्हीही शिकाल त्याच्याकडून बरच काही.*.  तेव्हा तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल निश्चितच... पाटाच्या पाण्यात भिजू द्या त्याला..  चिखल  मातीचा स्पर्श होऊद्या  त्यालाही..... बापाच्या अंगातील सदऱ्याला पडलेली  भोकं येऊ देत त्याच्या नजरेत.   रणरणत्या मातीच्या रावळावरून चालू द्या त्यालाही... त्याचे चटके त्याला आयुष्यभर *श्रमाची*   किंमत करायला शिकवतील.  दुपारी  शिदोरीतील सुकलेली भाकरी  आणि घोटभर पाण्याची चव त्यालाही चाखू दया  त्याला..  विसरेल तो *बाजारी मेव्याचा* फिका स्वाद..    त्यालाही रानमेवा,  कैरीच्या  आंबट-गोड फोडी, करवंद, जांभळं चाखू द्या...  तुमच्या बांधावर असतील तर बरं आणि नसतील तर तुम्हीही घ्या धडा शिकून आत्ताच.... बांधावरती एक तरी फळं झाड लावण्याचा निश्चय करायचा.  पुढच्या पिढीला  तोही मोठेपणी सांगेल तो  खेड्याची महती  आणि मातीची किमया..

सायंकाळी उसंत घ्या थोडीशी... मग  बसा सगळेजण एकत्र गोळा होऊन... टीव्ही- मोबाइल लाही द्या विश्रांती..   *तुम्हीही या माणसात आणि त्यालाही येउद्या*.. सांगा त्यांना गमतीजमती तुमच्या शालेय जीवनातल्या... तुमच्या यशापयशाच्या.... *शिकेल त्यातूनही तो बरेच काही*. ओळख करून द्या  जुन्या खेळांची..बिन खर्चाच्या मनोरंजनाची... सांगा त्याला गोष्टी पुन्हा राम- लक्ष्मणाच्या,  चिमणा चिमणीच्या,  पशुपक्ष्यांच्या, घरच्या -दारच्या.... डोळ्यांमध्ये त्याच्या दिसतील त्याला अनेक प्रश्नचिन्ह... साठेल  उत्सुकता... जमेल तेवढे प्रश्न सोडवून द्या... नाहीतर तोही सोडवील वेळ आल्यावर आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावर..  सोबत घेऊन बसा जेवायला.. तोही बसेल एका जागेवर.. वाटपाच तंत्र तोही शिकेल  आईकडून..  त्यालाही कळू द्या कमी-जास्त.. ओळख करून द्या त्याला चवीची,  रंगांची,  लहान -मोठ्याची,  मिठा -पिठाची,  आकारांची.... कारण *स्वयंपाक घर तर त्याच्या घरातली प्रयोगशाळाच आहे*. दाखवा त्याला नानाविध घरातले प्रयोग.  सहभागी करून घ्या त्यालाही..  त्याच्या उत्सुक नजरा मध्ये तुम्ही कधी  अडखळलाच  तर आम्ही आहोतच की... प्रयत्न करू.... त्यांच्या शंकेच्या निरसनासाठी एखादा कॉल केलात तर   अनलिमिटेड कॉलिंग च्या युगात तेवढा तर लाभ होईल..आम्हालाही आनंद होईल त्याच्याशी बोलण्याचा.. तुमच्याशी संवादाचा..

झगमगा टाच्या,  विजेच्या तारांगणातून थोडा वेळ बाजुला घ्या त्याला... दाखवा त्याला काळेकुट्ट आभाळ... चमचम करणारे तारे.. तारे, चंद्रकला, आकाश, दिशा यांचे  पुस्तकातील ओझे त्याचे होईल हळूहळू हलके... भूगोलाचे, विज्ञानाचे, परिसराचे  तोही बसेल नाते जोडत..... अडखळला कुठे तर आहोतच आम्ही... शक्य झालं तर आजीकडून अंगाई ऐकवा त्याला.... अन नसेल शक्य तर मऊशार  केसातून हलकेसे हळुवार बोटे फिरवत त्या'ला गुडूप  होऊ द्या  त्याला झोपेच्या स्वाधीन..... 
सगळं शिकू द्या त्याला  स्वतःला.  आता शाळेतला अभ्यास जर घरात शिकवायचा असेल तर मग त्याला  शाळेची गरजच काय?  शाळेतलं शाळेत घेईलच तो... त्याला आता  बाहेरच पण घेऊ द्या..  म्हणून शिकू द्या त्याला स्वतःहून... जगू द्या त्याला डोळे उघडून... लक्षात असुद्या फक्त सक्ती नको.. नको घोकंपट्टीला थारा...   काळजी करू नका आम्ही आहोतच त्याच्यासोबत तुमच्या सोबत..... आणि हो लक्षात ठेवा कोरोना मुक्तीचे नियम पाळा कुटुंबातच रहा.. सुरक्षित रहा. आमच्या विद्यार्थ्याला तुमच्याकडे सोपवत आहोत.. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या कडे लवकरच येत आहोत...
          आपल्या पाल्याचे गुरुजी

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...