*गावाकडच्या पालकास पत्र....*
प्रिय पालक हो...
तुमच्या मुलाच्या गुरुजींचा सप्रेम नमस्कार....🙏
पत्र लिहिण्यास कारण की, यंदा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुलं शाळेपासून आणि आमच्यापासून दूर झाली. एरवी मे महिन्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी म्हटलं की मुलांना पर्वणीच असायची. स्वैरपणे, आनंदाने सगळी सुट्टी संपत आली की पुन्हा त्यांना शाळेची ओढ लागायची. हे असच काहीसं आमच्या- तुमच्या लहानपणापासून परंपरागत चालत आलेल्या चक्र... या कालचक्राला *कोरोना* नावाच्या महाभयंकर राक्षसाने खोडा घातला. सबंध जगभरातील क्षणाक्षणावर स्वतःचे भीतीचे सावट लादले. त्याला कोणीच अपवाद राहिले नाही.मग त्याला ही *कोवळी मनं* तरी कसे अपवाद ठरणार? त्यांच्या बालमनाला सुद्धा आजूबाजूचे ऐकून- पाहून अनेक प्रश्न पडत असणार हे निश्चितच. तुम्हालाही तुमच्या मुलाच्या भवितव्याची, शिक्षणाची चिंता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच हे पत्र लिहुन आपल्याशी बोलावं, मोकळं व्हावं असं वाटलं.
यंदाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सर्वच मुलांना पास झाल्याचे आणि पुढील वर्गात प्रवेश केल्याचं तुम्ही ऐकला असेल. तरीही तुमचा पाल्य पुढच्या वर्गात जाण्यासाठी पात्र झाला आहे हे आम्ही कळवणे हे आमचे कर्तव्यच. त्यामुळे त्याच्या पास-नापास चिंता सोडून द्या.तो आता पुढच्या वर्गात जाणार, पण आता पुढे काय? याबाबत आपण बोलूया.....
गेले महिनाभर आपण आणि , मुले, कुटुंबीय सगळेजण घरीच आहोत. एरवी सतत कामात असणारे, बाहेर फिरणारे आपण आज या महा संकटामुळे बंदिस्त झालेले आहेत. तुम्हाला कंटाळा येणे स्वाभाविकच आहे. तुम्ही कंटाळला असेल तशी मुलही कंटाळले असतील. तुमच्यासमोर सुद्धा दैनंदिन जीवनाचे अनेक प्रश्न समोर असतील. तुमच्यासमोर सुद्धा अनेक समस्या समस्या निर्माण झाले असतील. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे, समस्यांची सोडवणूक परिस्थितीनुसार होत जाईल. पण कधी? केव्हा? हे निश्चित सांगता येणार नाही. असो आता तर मुलांच्या सुट्ट्यांच्या वेळेचा काय याबाबत आपण बोलूया..
*खरं तर शाळा बंद म्हणजे शिक्षण बंद* हा समज पहिला दूर करूया. मुलं शाळेतच शिकतात असं नाही. घर, कुटुंब, समाज, परिसर यातूनही त्याचे शिक्षण होत असतं, पण ह्यातून त्याने जे घेतलेलं शिक्षण आहे त्या शिक्षणाला विधायक मार्गातून पुढे मार्गस्थ होण्यासाठी शाळा गुरुजन प्रयत्न करत असतात. आज आम्ही त्यांच्या पासून दूर आहोत. सध्या चालू असलेला लॉक डाऊन मुळे संपर्क होणे शक्य नसलं तरी व्हाट्सअप च्या माध्यमातून मुलांच्या चाचण्या घ्या, उजळण्या घ्या, स्वाध्याय घ्या अभ्यास या असाही विचार पुढे आला आहे.. चालू आहे. बऱ्याच ठिकाणी सुरू असेल यावर बोलत बसण्यापेक्षा *आपण* आपल्या मुलांच्या साठी काय करू शकतो? याठिकाणी हा उपाय तांत्रिक कारणाने तकलादू ठरेल तेव्हा काय करायचं याबद्दल आपण बोलूया......
आज घरी असणाऱ्या मुलाचे तुम्ही *केवळ पालक नसून गुरुजी व्हा* असच काहीसं आव्हान मला आज करावस वाटतं. होय गुरुजी व्हा..... आता गुरुजी म्हणजे लेखन, वाचन, पाठांतर घ्या असंच नव्हे. मुलांना मारून मुटकून अभ्यासाला बसवा हेही नव्हे.. यापलीकडेही आम्ही गुरुजीं मुलांना भरपूर काही देत असतो. त्यातलंच काहीसं किंबहुना जास्त हे तुम्ही मुलांना देऊ शकता. पण हे करताना मुद्दामून सांगावसं वाटतंय की *त्यांच्यावर अभ्यासाचं ओझं लादू नका* मग काय करता येईल?
आता मे नंतर मुलांची उन्हाळी सुट्टी सुरू झालेली आहे.. ह्या सुट्टीचा आनंद घेऊ द्या त्यांना.... बागडू द्या..... कुटुंबात लुडबुड करू द्या.... त्यांना अटकाव करू नका... हटकू नका.... अभ्यास- अभ्यास- अभ्यास, पाठांतराचा लकडा त्यांच्यामागे लावू नका..... आता तुम्ही म्हणाल *"गुरुजी व्हा म्हणताय अन अभ्यास करायचं सांगायचं नाही"*.
असं कसं गुरुजी? *"होय, तसेच.."*
मग काय करायचं? लॉक डाऊन मुळे गावबंद, शहरे बंद, बाजार बंद, सगळं काही बंद आहे. कारण गल्लीत, बाजारात, शहरात *कोरोना* वावरत आहे. याची काळजी घेऊनच सगळ करायचा याचं भान हे आपल्याला असलं पाहिजे.
तुम्ही सर्वजण कुटुंबातील सदस्य सगळे घरीच आहेत ना.? असायलाच पाहिजे.... खरंतर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जाऊच नका. *अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावं लागलं तर तोंडाला मास्क लावून जा*. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवा.. *इथूनच खर्या अर्थाने मुलांच्या घरातल्या शिक्षणाची सुरुवात करा*. तुम्ही आरोग्याचे मंत्र पाळले तर मुलेही त्याचा अनुकरण करतील हळूहळू तीही शिकतील...
सकाळी उठल्यापासून सतत कामात असणारे तुम्ही, तुमचे कुटुंबीय,.... तुम्हालाही या लॉक डाऊन मुळे थोडीशी उसंत मिळाली असेलच.... तेव्हा या वेळात मुलाकडे अधिक लक्ष द्या... मुलांनाही घरातल्या छोट्या- छोट्या कामात गुंतवा. त्यांच्या शरीर स्वच्छतेकडे लक्ष द्या. स्वतःच्या गोष्टी स्वतःचं करण्याची सवय लावा. अधून मधून त्यांनाही सकाळी लवकर उठवा..पहाट कशी असते? चिमणी पाखरांची स्वच्छंदी किलबिल त्यांना जाणीवपूर्वक ऐकवा... दाखवा त्याला सूर्याचे उगवणे.. लाल बुंद सूर्यबिंब.... पशु -पक्षांचे आवाज ऐकवा... तेही शिकतील पशु पक्षांचे आवाज काढायला.. नकला करायला... भल्या पहाटे उठून राबणारी, गोठ्यातल्या शेणा मुतात हात घालणारी आई... हंबरणारी वासरे... त्यांना मायेनं चालणारी गाय... फेसाळणार दूध कसं काढलं जातं... हेही त्याला बघू द्या.. घरातल्या छोट्या मोठ्या कामात त्यालाही सहभागी करून घ्या. हलकं फुलकं काम आनंदाने करील तोही..... *पण सक्ती नाही हं चालणार..!* घरातली स्वच्छता, जेवणाचं ताट स्वतःचे स्वतः धुवायला शिकवा.. स्वतः पाणी घेऊन जेवायला बसायला शिकवा... पण ते तुमच्या कृतीतून... *आईलाही भरपूर काम असतात*. थोडासा आपणही तिला मदत करून हलकं करूया, म्हणून तिही करतील हे आनंदाने......
*भाकरीचं शेत* त्यांनी पुस्तकात वाचलेय. आता तुमच्या बरोबर त्याला आणखी शिकू द्या.. आता मिरगाची लगबग सुरू होईल.... न्या त्यालासुद्धा शेताच्या बांधावर.... घराच्या कणगीत, तट्ट्यात, टोपल्यात येणारे भात, ज्वारी कसं येतं? ते पुन्हा पुन्हा बघू दे त्याला..समजेल तोही... उन्हाच्या झळा लागू द्या त्यालाही.... घामाच्या धारांनी भिजुन चिंब होऊ दे त्यालाही..... त्याशिवाय *कष्टाची किंमत* त्याला तरी कशी कळणार...? नुसती पुस्तकात वाचून? 🤔 'पाऊस कसा पडतो?' हे विचारा त्याला....... त्यानं पुस्तकात वाचलेलं, बघितलेलं, घ्या वदवून त्याच्याकडून... *तुम्हीही शिकाल त्याच्याकडून बरच काही.*. तेव्हा तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल निश्चितच... पाटाच्या पाण्यात भिजू द्या त्याला.. चिखल मातीचा स्पर्श होऊद्या त्यालाही..... बापाच्या अंगातील सदऱ्याला पडलेली भोकं येऊ देत त्याच्या नजरेत. रणरणत्या मातीच्या रावळावरून चालू द्या त्यालाही... त्याचे चटके त्याला आयुष्यभर *श्रमाची* किंमत करायला शिकवतील. दुपारी शिदोरीतील सुकलेली भाकरी आणि घोटभर पाण्याची चव त्यालाही चाखू दया त्याला.. विसरेल तो *बाजारी मेव्याचा* फिका स्वाद.. त्यालाही रानमेवा, कैरीच्या आंबट-गोड फोडी, करवंद, जांभळं चाखू द्या... तुमच्या बांधावर असतील तर बरं आणि नसतील तर तुम्हीही घ्या धडा शिकून आत्ताच.... बांधावरती एक तरी फळं झाड लावण्याचा निश्चय करायचा. पुढच्या पिढीला तोही मोठेपणी सांगेल तो खेड्याची महती आणि मातीची किमया..
सायंकाळी उसंत घ्या थोडीशी... मग बसा सगळेजण एकत्र गोळा होऊन... टीव्ही- मोबाइल लाही द्या विश्रांती.. *तुम्हीही या माणसात आणि त्यालाही येउद्या*.. सांगा त्यांना गमतीजमती तुमच्या शालेय जीवनातल्या... तुमच्या यशापयशाच्या.... *शिकेल त्यातूनही तो बरेच काही*. ओळख करून द्या जुन्या खेळांची..बिन खर्चाच्या मनोरंजनाची... सांगा त्याला गोष्टी पुन्हा राम- लक्ष्मणाच्या, चिमणा चिमणीच्या, पशुपक्ष्यांच्या, घरच्या -दारच्या.... डोळ्यांमध्ये त्याच्या दिसतील त्याला अनेक प्रश्नचिन्ह... साठेल उत्सुकता... जमेल तेवढे प्रश्न सोडवून द्या... नाहीतर तोही सोडवील वेळ आल्यावर आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावर.. सोबत घेऊन बसा जेवायला.. तोही बसेल एका जागेवर.. वाटपाच तंत्र तोही शिकेल आईकडून.. त्यालाही कळू द्या कमी-जास्त.. ओळख करून द्या त्याला चवीची, रंगांची, लहान -मोठ्याची, मिठा -पिठाची, आकारांची.... कारण *स्वयंपाक घर तर त्याच्या घरातली प्रयोगशाळाच आहे*. दाखवा त्याला नानाविध घरातले प्रयोग. सहभागी करून घ्या त्यालाही.. त्याच्या उत्सुक नजरा मध्ये तुम्ही कधी अडखळलाच तर आम्ही आहोतच की... प्रयत्न करू.... त्यांच्या शंकेच्या निरसनासाठी एखादा कॉल केलात तर अनलिमिटेड कॉलिंग च्या युगात तेवढा तर लाभ होईल..आम्हालाही आनंद होईल त्याच्याशी बोलण्याचा.. तुमच्याशी संवादाचा..
झगमगा टाच्या, विजेच्या तारांगणातून थोडा वेळ बाजुला घ्या त्याला... दाखवा त्याला काळेकुट्ट आभाळ... चमचम करणारे तारे.. तारे, चंद्रकला, आकाश, दिशा यांचे पुस्तकातील ओझे त्याचे होईल हळूहळू हलके... भूगोलाचे, विज्ञानाचे, परिसराचे तोही बसेल नाते जोडत..... अडखळला कुठे तर आहोतच आम्ही... शक्य झालं तर आजीकडून अंगाई ऐकवा त्याला.... अन नसेल शक्य तर मऊशार केसातून हलकेसे हळुवार बोटे फिरवत त्या'ला गुडूप होऊ द्या त्याला झोपेच्या स्वाधीन.....
सगळं शिकू द्या त्याला स्वतःला. आता शाळेतला अभ्यास जर घरात शिकवायचा असेल तर मग त्याला शाळेची गरजच काय? शाळेतलं शाळेत घेईलच तो... त्याला आता बाहेरच पण घेऊ द्या.. म्हणून शिकू द्या त्याला स्वतःहून... जगू द्या त्याला डोळे उघडून... लक्षात असुद्या फक्त सक्ती नको.. नको घोकंपट्टीला थारा... काळजी करू नका आम्ही आहोतच त्याच्यासोबत तुमच्या सोबत..... आणि हो लक्षात ठेवा कोरोना मुक्तीचे नियम पाळा कुटुंबातच रहा.. सुरक्षित रहा. आमच्या विद्यार्थ्याला तुमच्याकडे सोपवत आहोत.. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या कडे लवकरच येत आहोत...
आपल्या पाल्याचे गुरुजी

No comments:
Post a Comment