Tuesday, 22 October 2019

इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं .

इयत्ता ४ थीत असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली .

पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते .

इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं .

शौर्य , धैर्य , बुध्दिमत्ता , चातुर्य , लढाऊपणा , सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पाना पानावर ओसंडून वाहत होतं .

शिवरायांचे बालपण , शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो , रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा होण्याची इच्छा व्हायची.

अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेली मगरमिठी आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या .

आगऱ्याच्या दरबारातील स्वाभिमानाची फोडलेली डरकाळी, औरंगजेबाच्या हातावर तुरी, वाचताना रक्त सळसळून उठायचं.

गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या .......
त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले .

याच पुस्तकाने शिवचरित्रावरील अभ्यासाची पहिल्यांदा गोडी लावली ,
ज्याने पहिल्यांदा महाराज ,
हिन्दवी स्वराज्य ,
 मावळे ,
 बाजी ,
तानाजी
शिवराज्याभिषेक
 या साऱ्यांची पहिली ओळख ज्या पुस्तकाने करुन दिली ते इयत्ता चौथीचं पुस्तक आजही हातात घ्यावसं वाटतं .

इतिहासाची आणखी कोणतीही पुस्तके वाचली तरी या पुस्तकाचं स्थान सर्वोच्च राहिल.

#शिवराय_म्हणजेच_इतिहास
#शिवराय_म्हणजेच_भविष्य

जय भवानी🚩 
    जय जिजाऊ🚩
     जय शहाजीराजे🚩
              जय शिवराय🚩     
                    जय शंभूराजे🚩

No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...