विध्यानिकेतन हायस्कूल औरंगाबाद
कळसुबाई शिखरावर गिरिभ्रमन
स्वच्छता मोहीम यशस्वी...
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर गिरिप्रेमींनी
यशस्वीपणे चढाई केली.
कळसुबाई शिखर हे समुद्र
सपाटीपासून पाच हजार चारशे फूट उंच आहे हायस्कूलच्या ग्रुप नी शिखरावर गिरिभ्रमनाबरोबरच
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक बॉटल कॅरीब्याक चॉकलेटचे कागद आदी वस्तू गोळा करून पायथ्याशी आणत
शिखर परिसर स्वच्छ देखील केला.
गिरिप्रेमींना हे शिखर
नेहमीच खुणावत असते मोहिमेदरम्यान सर्व सहभागी ग्रुप नि शिखराच्या पायथ्याशी असलेल्या
बारी या गावाजवळील छोटी नदी ओलांडून शिखराकडे आगेकूच केली.परिसर दाट धुक्याने वेढल्याने
निसर्गाचा हा आनंद सर्वजण घेत होते या साहसी चढाईचा अनुभव सर्वांसाठी वेगळा ठरला.मोहीम
यशस्वीतेसाठी श्री संतोष गाडेकर सर,श्री रवी अंभोरे सर ,श्री किरण अंभोरे,श्री आनंद तायडे,श्री सुशील अंभोरे, श्री भगवान कुबेर,श्री प्रितेश सराटे,श्री आशिष भालेराव ,श्रीअभिषेख कोल्हे ,श्री तेजस देशमुख ,श्री शुभम ढेपे सर श्री.प्रशांत शिंदे सर
आदींनी परिश्रम घेतले.
मोहिमेचे श्री. पंढरीनाथ गाडेकर
सर ,श्री.विजय सोनवणे,श्री.सागर मगरे,श्री.विजय सिरसवाल, श्री.सुनील पाटील सर यांनी नेतृत्व केले.

No comments:
Post a Comment