Wednesday, 20 March 2019

औरंगाबाद शहरातुन आज सायंकाळी पहा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक*

*औरंगाबाद  शहरातुन आज सायंकाळी  पहा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक*

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक  हे आज  *दिनांक 20 मार्च 2019* रोजी सायंकाळी औरंगाबाद शहरा वरून जाताना नुसत्या डोळ्यांनी पहायला मिळणार आहे.
आज होलीका पोर्णिमा व त्यातच सायंकाळी *सुर्य मावळल्या नंतर साडे सात वाजता* पश्चिम क्षितिजावर तीस अंशांवर हे अंतराळ स्थानक दिसण्यासाठी सुरूवात होईल.  यावेळी एक तेजस्वी प्रकाश गोळा उत्तर पुर्वोत्तर दिशे कडे जाताना नुसत्या डोळ्यांनी पहायला मिळणार आहे
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक साडे सात वाजता दिसायला सुरुवात होईल व चार मिनीटांनी म्हणजे सायंकाळी सात वाजून चौतिसाव्या मिनीटांनी परत दिसेनासा होईल.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे फुटबॉल च्या मैदाना एवढे आकाराचे असून साधारण पाचशे  किमी अंतरावरून पृथ्वीला दिवसातुन सोळा प्रदक्षिणा घालते आहे.

*मग लागा तयारीला अन् आपणही आपल्या औरंगाबाद  शहरावरुन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पहायचा आनंद लुटा*
*एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब*
एमजीएम परिसर , एन ६ -  सिडको
*औरंगाबाद. 

No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...