Saturday, 23 March 2019

आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.

आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.
हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढगपाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिशMeteorologyमीटिअरॉलजी ;) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करोन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.
हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत  हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. हवामान बदलाच्या परिणामांमुळे आज भारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

२०१० ते २०१३ या काळात अत्याधिक हवामानबदलाच्या अनेक घडामोडी घडून आल्या. या घडामोडींनुसार, २०१० ते २०११ हे वर्ष गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. २०१० ते २०१३ ही अत्याधिक हिमवादळे आणि थंडीची वर्षे ठरली. २०१० ते २०१३ हा अत्याधिक पावसाचे व वादळांचा कालखंड ठरला. त्याचबरोबर भारतात दिवस आणि रात्रीच्या तापमानातही वाढ झाली. मान्सून लहरी बनला. जागतिक हवामानातील या बदलांची आपण वेळीच दखल घेतली नाही आणि त्यासंबंधात योग्य ते खबरदारीचे उपाय योजले नाहीत तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर कोणते भयावह संकट ओढवेल. 

No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...