Thursday 15 August 2019

#भारत_माझा_देश_मी_देशाचा_कोण ???

🇮🇳
#भारत_माझा_देश_मी_देशाचा_कोण ???

🇮🇳भारत माझा देश... मी देशाचा कोण...??? हे वाक्य कुठेतरी वाचलं आणि खरंच मनाला प्रश्न पडला, नक्की कोण आहोत आपण या देशाचे ? फक्त एक नागरिक? बरं नागरिक म्हणून तरी पात्रतेचे आहोत का? ज्या देशाला आपण आईचा दर्जा देतो तिचा आदर राखतो का आपण? की फक्त by default या देशात जन्म झालाय म्हणून भारतीय आहोत?

🇮🇳आपण फक्त नागरिक नसून एक भारतीय नागरिक आहोत ही बाब आपल्या ब-याचदा लक्षातच येत नाही. 'भारतीय नागरिक' असा उल्लेख करण्याचा उद्देश इतकाच की भारतीय असणं किंवा भारतीय म्हणून जन्माला येणं हेच मुळात मोठं नशीब आहे (असा मला तरी वाटत).

🇮🇳मागे वळून पाहताना आपल्या देशाचा भव्य असा इतिहास खुणावत असतो. ब-याचदा विनवणी देखील करीत असतो की, बाबांनो आम्ही रक्त सांडलंय रे तुमच्यासाठी, तुम्हाला देश सोडाच त्या देशाचा झेंडादेखील सांभाळता येऊ नये ? १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीपुरताच कसा काय जागा होतो तुमच्यातला क्रान्तिकारक?
🇮🇳ज्या देशाला आपण आई मानतो त्याच देशाबाद्दल लोक स-हास नाव ठेवायला दोन पाऊले पुढे असतात! 'ये भारत हे, यहा कूच भी हो सकता हे!!' असे डायलॉग तुम्ही ब-याचदा ऐकले असतील, तेव्हाच स्वतः:ला विचारायचं, ज्या भारताला मी नाव ठेवतोय  किंवा ज्या देशाबद्दल मी हे ऐकतोय त्या देशाचा, त्या भाराताचा मी कोण आहे? मी असं म्हणतच नाहीये की आपला देश परिपूर्ण आहे, कोणताच देश कधीच परिपूर्ण नसतो.
🇮🇳देशातील लोकांवरून देशाची प्रगती, उन्नत्ती आणि संस्कृती ठरत असते. देशाचा नागरिक हा देशाचा आरसा असतो. आपल्याला आज ही स्वच्छतेसाठी मोठ्या पातळीवर कॅम्पिअन घ्यावी लागतात. पण आपण स्वत: केव्हा जागे होणार?
🇮🇳देश चालवणं फक्त सरकारच काम नाही!! आपण फक्त जगात देशाचा लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक यावा म्हणून जन्म घेतलाय का? सिग्नल पाळणं, सस्त्यावर न थुंकणं, देशाची मालमत्ता जपणं, तिचा आदर राखणं ही कोणाची कर्तव्य आहेत? कर्तव्याला जबाबदारी म्हणून घ्यायला केव्हा शिकणार आपण??

🇮🇳आजकालच्या राष्ट्रवादाच्या व्याख्या देखील बदलल्या आहेत, काहींना सोशल मीडियावर झळकण्यापुरताच देश उमगला तर काहींना अभिव्यक्ती हक्क मागण्यापुरता, काहींसाठी तर स्वातंत्र्यदिन म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस असतो.
🇮🇳देशाने मला काय दिल ह्याआधी, मी देशाला काय दिल हे महत्त्वाचं नाही का ?
🇮🇳हा फक्त आपला स्वातंत्रदिन नाही, हा देशाच्या मातीचा, मातीत मिसळलेल्या शहीदांच्या, क्रान्तिकारकांच्या रक्ताचा ही स्वातंत्र्यदिन आहे.

🇮🇳लहानपणीची प्रतिज्ञा आठवतीये??

भारत माझा देश आहे... पण मी देशाचा कोण आहे मला ठाऊक नाही...
सारे भारतीय माझे बांधव आहेत... पण त्या बांधवांशी बांधीलकी ठेवणं मला जमत नाही...
माझ्या देशातल्या समृद्ध आणि परंपरेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे... पण त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी प्रयत्न करतोच असे नाही...
मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन...पण माझा देश जीला मी आई मानतो तिला सतत नाव ठेवत राहीन...
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे... पण त्याच देशाच्या मुलीवर कोण अत्याचार करत असेल तर मी माझे डोळे, कान आणि तोंड बंद ठेवेन...
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे... खरं तर मला फक्त माझ्या सौख्याबद्दल देणं-घेणं आहे देशाच्या प्रतिष्ठेबद्दल
मला कर्तव्य नाही...

🇮🇳त्या प्रतिज्ञेच वास्तव स्परूप कुठेतरी असं आहे हे दुर्देव आहे ह्या देशाच..!! प्रतिज्ञा आपण लहानपणी शाळेत घोकायचो तेव्हा इतकी समज नव्हती पण आता तर आहे ना? यावर विचार किती जण करतात? अर्थात सर्वच असे आहेत असं सांगण्याचा कल नक्कीच नाही, पण गुणोत्तर निश्चितच कमी आहे. ह्या प्रतिज्ञेतला 'पण' जेव्हा प्रत्येक नागरिकाच्या मनातून दूर होईल तेव्हा ख-या अर्थाने आपला भारत देश सुजलाम-सुफलाम होईल.

🇮🇳उद्यापासून परत काही जण एक आम नागरिक होऊन जातील म्हणून आज हे सगळं सांगण्याचा उद्देश.

🇮🇳Remember One thing,

🇮🇳"We are not normal Citizen, We are An INDIAN CITIZEN!!"

"आपण भारत हमको जान से प्यारा है!!"🇮🇳🇮🇳🇮🇳
CountryFirstCountryLast🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद!!🇮🇳🇮🇳🇮🇳🙏😊🇮🇳🇮🇳🇮🇳





No comments:

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...