Sunday, 3 May 2020

सर्वांचे अभिनंदन व आभार 🙏


*माझ्या फ्रेण्डलिस्ट मधील कोणालाही कोरोनाची बाधा झालेली नाही. मला अभिमान आहे, की माझ्या फ्रेण्डलिस्ट मधील सर्व लोक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि स्वतःची काळजी घेणारे आहेत. यापुढे देखील आपण काळजी घ्या. आपण सर्वांनी स्वतःला आणि देशाला सहकार्य केले आहे. तुमचे अभिनंदन आणि आभार देखील.....👏🏻🙏🏻*                     
                           🙏 *आर. बी. अंभोरे पाटील मित्र परिवार*🙏

Saturday, 2 May 2020

​टेन्शन घ्यायचंच नाही​...

कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... ​ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो​...
 आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...
कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो...
  कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." 
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या;.; सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात.
*सकारात्मक रहा --*
                                                                - प्रा.रवी अंभोरे पाटील

Saturday, 4 April 2020

कोरोना....

मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते. जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे. अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात. अगदी प्रत्येक वर्षी मरतात. टी. बी. ने जगभर दरवर्षी 15 लाख लोक  मरतात. त्यातील फक्त भारतात पाच लाख लोक दरवर्षी मरतात. आज रोजी, अगदी आत्ता भारतात 27 लाख 90 हजार लोकांना टी. बी.ची लागण झालेली आहे. त्यातील किती मरतील हे या क्षणी सांगता येणार नाही. हे मरणाचे आकडे पाहिले आणि आजचा कोरोना पाहिला तर कोरोना हा सर्वात माईल्ड आजार आहे, असेच म्हणावे लागेल. गेल्या वर्षी भारतातील 67000 लोकांना डेंगू झाला होता.

*कोरोना एक कॉमन कोल्ड*

कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार! अनेक ग्रंथामध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल. आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल.
हे मी माझ्या मनाचे सांगित नाही. पद्मश्री डॉ. रमण खंडेलवाल यांची गेल्या चार दिवसापूर्वी माझावर मुलाखत घेतली होती. ते याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी कोरोना विषयी खूप छान तथ्यात्मक माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या व्हायरसची जरी लागण झाली तरी 80 टक्के लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो आणि चार-सहा दिवसांमध्ये आपोआप निघूनही जातो. 15 टक्के लोकांना सामान्य उपचारांची गरज भासते. तेही साध्या उपचाराने बरे होऊ शकतात. पाच टक्के लोकांच्या बाबतीत मात्र कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, हृदयविकार, टी.बी. किंवा तत्सम स्वरूपाचा पूर्वीचाच कुठला तरी आजार आहे. अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात. हे आहे कोरोनाचे सत्य. म्हणजे सुमारे 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळ जवळ नगण्य आहे. साध्या उपचारानेही तो बरा होऊ शकतो.

*कोरोनाचा प्रसार*

कोरोनाचा प्रसार हवेतून होत नाही. त्यामुळे आपण एकटे असताना किंवा आपल्या आसपास काही फुटांवर कोणी माणूस नसताना तोंडाला मास्क बांधणे अवैज्ञानिक आहे. कोरोनाचा आकार आहे, शंभर नॅनोमिटर. आणि आपल्या फडक्याची छिद्रे किती मोठी असतात, आपणास माहीत आहेच. मित्रांनो! आपण नव्हतो, तेव्हाही लाखो व्हायरस होते आणि आपण नसल्यानंतरही व्हायरस राहाणार आहेत. या विश्वातील सर्व प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, किटक, जिवाणू, विषाणू हे सर्व निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याबरोबरच आपणास आपले जीवन जगायचे आहे. या जगात सुमारे 2 लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत. आपण त्यांना टाळू शकत नाही. तर आपण स्वतःला अधिक सामर्थ्यशाली, शक्तीशाली बनवावे लागते. त्याच्या काही पद्धती आहेत.

*डर का माहोल*

अनेक प्रकारच्या रोगांने मृत्यूचा आकडा पाहिला तर कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मात्र कोरोनाने झालेल्या मृत्यूचा स्फोट केला जातोय. जगात कुठेही कोणी कोरोनाने मेले तर लाखो-कोट्यवधी माध्यमांतून त्याची बातमी जगभर पसरवली जातेय. त्यातून एक फार मोठी भिती जनमानसामध्ये पसरली आहे. मरणाच्या बातम्या पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. चांगले झालेल्या लोकांचे आकडे फोकस करून सांगितले जात नाहीत.

*भीतीचे परिणाम*

पूर्वी येऊन गेलेल्या साथीवर अनेक मानसशास्त्रज्ञांनी समाजातील लोकांचे सर्व्हे केले तेव्हा लक्षात असे आले की प्लेग, देवी वगैरे आजारांनी मेलेल्या लोकांपेक्षा नुसत्या भीतीने मेलेल्या लोकांची संख्या जास्त होती! कुठल्याही साथीला, आजाराला, परिस्थितीला सामोरे जायचे असते. भ्यायचे नसते. पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करायचा असतो. यातच माणसाचे मनुष्यपण आहे. पण आज जास्तीत जास्त भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम जणू काय मुद्दाम केले जातेय असे वाटायला लागते. त्याच्या ब्रेकिंक न्यूजचा विषय बनवला गेलाय. सामान्य माणसाला इतर गोष्टींची माहिती नसल्याने भीतीने ते अगदी गांगरून जातात. ही भीती का पसरवली जातेय, त्याचे कारण आहे.

*डर का व्यापार*

जितकी भीत मोठी तितका मोठा व्यापार करता येतो. हे व्यापार कोण करतं, हे आजपर्यंतच्या इतिहासाने पुनःपुन्हा दाखवून दिलेले आहे. या जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ जर कुठली असेल तर ती आहे, हेल्थ इंडस्ट्री.

*सत्ता आणि सत्य*

विज्ञान हे सत्यावर आणि तथ्यावर चालत असते आणि सत्ता किंवा सरकार हे पर्शेप्शनवर चालत असते. तेव्हा विज्ञान काय सांगते, आजपर्यंत जे जे संशोधन झालेले आहे, ते काय सांगते त्याच्याकडे जरा डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. वैज्ञानिक तथ्य जर समजून घेतले तर भीतीचे वातावरणही निवळेल आणि जगण्याचा सुंदर मार्गही सापडेल. स्वातंत्र्याच्या वातावरणात मुक्तपणे श्वास घेण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या श्रद्धेला आपण जागे करूया. प्रेमाने प्रस्फुरीत झालेले आणि ज्ञानाने दिग्दर्शित केलेले विवेकी जीवन आपण जगूया. हा डर का माहोल योग्य नाही. तो वैज्ञानिक नाही. सत्यावर आधारित नाही. तो एक बाजारू फंडा आहे. सरकार काय सांगते आणि विज्ञान काय सांगते याचा विचार व्हायला हवा.

*माणसे का मरताहेत?*

कोरोना एक कॉमन कोल्ड आहे, तर इतकी माणसे का मरताहेत? असा स्वाभाविक प्रश्न विचारला जातोय.
1. त्याचे उत्तर असे की माणसे नेहमीच मरत असतात. ती जगभर मरतात. कोरोनाच्या नावावर जेवढी मरणे खपवली त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या आजाराने मरताहेत. संपूर्ण जगातील आकडा इतर रोगांच्या मानाने फारच कमी आहे.
2. ज्या इटलीमध्ये जास्त माणसे मेली कारण इटलीत वृद्ध माणसांची संख्या जास्त आहे. म्हातारी माणसे काहीतरी निमित्त होऊन मरतातच.
3. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माणसे उपचाराच्या पद्धतीमुळे जास्त मरताहेत! कोरोना झालेल्या माणसांवर जे प्रोटोकॉलनुसार उपचार केले जाताहेत त्यामुळे माणसे जास्त मरताहेत. कारण त्याच्यावर नको त्या औषधांचा मारा केला जातोय. त्यामुळे जीवनशक्ती अगदी कमकुवत होऊन जाते आणि मग शरीर साथ द्यायची सोडून देते. म्हणजे इथे रोगापेक्षा उपाय भयंकर आहे.
गेल्या वर्षी इटलीमध्ये नुसत्या मलेरियाने दोन लाख लोक मेले होते. मात्र त्याच्या अशा बातम्या दाखवल्या नाहीत. त्याच्या ब्रेकिंग न्यूज आल्या नाहीत. म्हणून ते लोकांना माहीत नाही. ईश्वर ना करो, पण इटलीमध्ये अजून मरणाचा आकडा वाढू शकतो. कारण प्रत्येक वर्षी तिथे तेवढे लोक इन्फेक्शनने मरतातच. आय. एल. आय. म्हणजे इन्फ्लुएंझा लाईड इलनेस या आजाराने 20 हजारांहून लोक मेले होते.

*निसर्गाची व्यवस्था*

साथी येतात-जातात, दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महामारी हे एक निसर्गाची बॅलन्सिंग व्यवस्था आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अनेक गोष्टींमध्ये विषमता निर्माण होते, सृष्टीचक्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचे बॅलंसिंग साधले जाते. ही व्यवस्थासुद्धा नैसर्गिक नियमाचाच एक भाग आहे.
जन्म-मरण हे चक्र सातत्याने सुरूच आहे. निसर्ग काही आपल्या हातातील गोष्ट नाही. तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण करीत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो किंवा तिचा मुकाबला कसा करतो, तिला प्रतिसाद कसा व काय देतो, याच्यावर आपले जीवन, जगणे आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात.

*आपण व्हायरसला मारू शकत नाही*

व्हायरस हे जिवंत व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे त्याला मारू शकत नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो. आपण व्हायरसपासून पळून जाऊ शकत नाही. घरात कोंढून घेतले तरी आपल्या घरात आपल्या आसपास हजारो-लाखो व्हायरस वावरत असतात! खरे तर व्हायरस हा आपला निसर्गातील एक सोबती आहे, सहचारी आहे. मग आपण काय करायचे? आपण जसे पडणाऱ्या पावसाला थोपवून धरू शकत नाही. तसे व्हायरसला थोपवू शकत नाही. मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आपण छत्रीचा वापर करतो. नेहमीसाठी घर बांधून ठेवतो. जेव्हा लढायी सुरू असते तेव्हा आपल्यावर वार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपण ढालीचा वापर करतो आणि आलेला वार त्याच्यावर झेलतो. तसेच व्हायरसचा मार झेलण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती नावाची जी ढाल आहे, तिचा वापर करणे हाच याचा प्रथम आणि शेवटचा सर्वोत्तम उपाय आहे. हा उपाय कोण सांगू शकते? जनमानसापर्यंत कोण घेऊन जाऊ शकते? हे काम डब्ल्यू. एच. ओ. करणार नाही. हे काम इंडियन मेडिकल असोशिएशन करणार नाही. हे काम फक्त आयुष मंत्रालय करू शकते. आता फक्त एकच आशा भारतातील आयुष मंत्रालयावर आहे.

*कोरोना इज कॉन्फरशी*

फरिदाबाद निवासी डॉ. विश्वरूपराय चौधरी यांनी जानेवारीमध्येच सांगितले होते, की कोरोना ही एक कॉन्फरशी आहे. आता तर निकारूआ, ब्राझील आणि मॅक्सिकोचे अध्यक्षही जाहीरपणे म्हणताहेत की, कोरोना ही कॉन्फरशी आहे. ते एक षडयंत्र आहे!

*कोरोना एक हॉरर पिक्चर*

तुम्ही कधी भुताचा हॉरर सिनेमा पाहिलाय का? आपल्याला माहीत असते की पडद्यावरचे भूत येऊन आपल्याला काहीही करणार नाही. तरीही आपण घाबरलेले असतो. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तसे आपल्या घरातल्या टी.व्ही.वर हा कोरोनाचा हॉरर पिक्चर सुरू आहे. घरातल्या छोट्या पडद्यावर आता त्याचा क्लायमॅक्स होत आलाय. काही दिवसांतच त्याचा दी एन्ड होईल! कोरोना हा एक हॉरर पिक्चरसारखाच भाग निर्माण केलाय. लक्षात ठेवा, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. तो 80 टक्के लोकांना झालेला माहीतही होत नाही. साधा आजार आहे. भिऊ नका. दक्षता घ्या.

*जीवन आणि दक्षता*

फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पदोपदी दक्ष राहावे लागते. थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो. दुर्लक्ष झाले तर अपघात होऊ शकतो. दक्षता ही जीवनभर नेहमीसाठी घेण्याची गोष्ट आहे. तशीच दक्षता घ्या. भीती नको. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको तो आजार चिकटतो. त्यामुळे भीती सोडा आणि दक्ष व्हा!

*औषधाने आजार बरा होत नाही*

कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा.

*प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री*

प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते.
1. प्राकृतिक आहार – यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत. नंतर तुम्हाला जे हवे ते खा. अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
2. योग्य तो व्यायाम – व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे.
3. पुरेसा विश्राम – शांत आणि गाढ झोप घ्यावी. अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे. ती रोज झोपेत मिळते. पण शांत झोपच लागत नाही. त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे. तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे.

मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसासी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे, असे म्हणावे लागेल.

स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!

Saturday, 21 March 2020

जनता कर्फू २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळा. घराबाहेर पडू नका. आपला जीव वाचवा.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बुद्धीकौशल्याचा कुणालाच थांग लागत नाही. विचार करा मोदी साहेबांनी २२ तारखेलाच जनता कर्फ्यू का लावला असेल ? संपुर्ण देशाचं पालकत्व स्वीकारलेल्या या अवलियाच्या विचारप्रगल्भतेवरचा पडदा मी हटवतो आहे मित्रांनो.

२२ मार्च म्हणजे फाल्गुन कृष्ण १३ शततारका होय. या दिवशी मधुकृष्ण त्रयोदशी वारुणी योग आहे. पंचांगानुसार २२ मार्च हा त्याज्य दिवस असून या दिवशी प्रखर उन असते. म्हणजे सूर्य प्रखरतेने तळपणारा हा दिवस आहे. कोरोना रोग भविष्यात भारतात येणार त्यावेळी आपण काय उपाय केले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी आदरणीय मोदीजींनी दोन महिन्यापूर्वी नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली होती.

त्यावेळी अनेकांनी त्यांची चेष्टा केली. पण, मोदींजींनी उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवर रसायन फवारता येईल का याबाबत इस्त्रो आणि नासाच्या शास्त्रज्ञांससोबत चर्चा केली. तेव्हा अनेकांना मोदींच्या बौद्धिक चातुर्याचे नवल वाटले. नासाच्या शास्त्रज्ञांनी तर मोदींचा आणि आईनस्टाईनच्या मेंदूचा आयक्यू सेम आहे, अशीही प्रशंसा केली. त्यावेळी मोदींनी २२ मार्चला सूर्यासमोर रसायनाने भरलेला उपग्रह आणायचा प्रस्ताव मांडला.

२२ मार्चला सकाळी सात वाजता त्या उपग्रहावर सूर्याची अतिनील किरणे पडतील. त्यानंतर उपग्रहातून वायूगळती होऊन त्याची वाफ उन्हाद्वारे पृथ्वीच्या दिशेने निघेल. पृथ्वीच्या वेगाशी उपग्रहाचा वेग मॅच केल्यास आशिया खंडातील फक्त भारत देशावर त्याची वाफ पसरेल असे गणितही आदरणीय मोदीजींनी मांडले.

विशेष म्हणजे नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यावर चर्चा करुन हे शक्य असल्याचेही सांगितले. ही बातमी गुप्त ठेवण्याचे ठरले होते. पण, नासावाले फुटीर निघाले. त्यांनी ही गोष्ट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोलांड ट्रम्प यांना सांगितली. ट्रम्पही आश्चर्यचकित झाले. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनी आदरणीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने विद्वान असल्याचे स्पष्ट केले. त्यावर हा प्रयोग अमेरिकेत व्हायला हवा, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, अंतराळात रसायनाने भरलेला उपग्रह भारतीय बनावटीचा असून त्याचा रिमोट मोदीजींकडे असल्याने नासाच्या अधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले. म्हणून मोदीजींना विनंती करण्यासाठी महिन्याभरापूर्वी डोलांड ट्रम्प भारतातही आले. पण, मोदीजींनी त्यांना हुसकावून लावले.

आता प्रश्न हा होता की दिवसभराच्या प्रखर उन्हात तो वायू भारतभर पसरला तर त्याचा लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम तर होणार नाही ना ? पण, याचेही उत्तर मोदींजीकडे तयार होते. या उत्तरासाठी मोदीजींनी हिमालयात आत्मसात केलेली विद्या कमी आली. मानवी शरीर हे पंचतत्वापासून बनलेले असते. प्रत्येक शरीरामध्ये आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी ही पंचतत्व असतात. आपण टाळी वाजवली कि ही पंचतत्व उत्तेजित होतात आणि शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून मोदीजींनी २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात, असे आवाहन केले आहे.

मित्रांनो, देशासाठी हा माणूस तहान भूक हरपून लढतो आहे. त्याच्या प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक कृतीत हजारो विचार दडलेले असतात. तुम्ही त्यांना नावं ठेवत असाल तर ठेवा, पण, मी विनंती करतो की २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळा. घराबाहेर पडू नका. आपला जीव वाचवा.

Wednesday, 19 February 2020

शिवजयंती!







छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे, हीच खरी शिवजयंती ! 



‘विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहोत. जयंती साजरी करणे, म्हणजे केवळ पोवाडे लावणे किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम करणे एवढ्यापुरते मर्यादित आहे का ? खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी करणे, म्हणजे शिवरायांचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय करणे होय. सध्या याला एका उत्सवाचे स्वरूप आले आहे. आपल्याला यामध्ये पालट करायचा आहे; कारण शिवरायांसारखे आदर्श जीवन जगणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श युगपुरुषाला घडवणारी त्यांची जीवनपद्धत आणि आपली जीवनपद्धत

खेळ खेळणे

मर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे : शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा, घोड्यावर स्वार होणे, तलवार चालवणे अशा खेळांमुळे त्यांच्यात निर्भयता, क्षात्रवृत्ती, अन्यायाविरुद्ध चीड, लढाऊवृत्ती, तसेच नेतृत्वगुण असे अनेक गुण निर्माण झाले.
मित्रांनो, गुणच आपल्या जीवनाचा पाया आहे; म्हणून आपण प्रत्यक्ष मर्दानी खेळ खेळलो, तरच आपल्यात गुण येतील.
काल्पनिक खेळांमुळे विध्वंसकतेकडे वाटचाल होत असल्याने त्यांवर बहिष्कार टाकणे आवश्यक : सध्या मुले संगणकावर काल्पनिक खेळ खेळतात. ते खेळ विध्वंसक आणि विकृत विचार निर्माण करणारे असतात, उदा. विकृत पद्धतीने गाडी चालवणे, कुणालाही बंदुकीने मारणे, एकमेकांना मारणे इत्यादी.
मित्रांनो, अशा खेळांतून मुले मनाने दुर्बळ होऊन विकृत होतात. हे खेळ काल्पनिक असल्याने मुले वास्तवात न जगता कल्पनेच्या विश्वात वावरतात आणि त्यामुळे मुलांना वास्तव जीवन जगणे कठीण जाते. ती आत्मकेंद्रित बनल्याने ‘मला या राष्ट्रासाठी जगायचे आहे’, हा व्यापक विचार त्यांच्या मनात येत नाही. अशा मुलांमध्ये राष्ट्रप्रेमच निर्माण होत नसल्याने ती मुले राष्ट्राचे रक्षण करतील का ? मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की, आपल्याला संगणकावरील खेळ खेळून विकृत व्हायचे कि छत्रपती शिवरायांसारखे क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे ? आता आपण निश्चय करूया की, संगणकावरील खेळांवर बहिष्कार टाकायचा आणि प्रत्यक्ष खेळ खेळायचा. हीच खरी शिवजयंती आहे. मग कराल ना ?

गोष्टी वाचणे आणि ऐकणे

उत्तम संस्कार करून घेणे : शिवराय नेहमी रामकृष्ण यांच्या गोष्टी वाचत आणि ऐकत. प्रत्यक्ष घडलेल्या आणि ज्यांमधून देवभक्ती, राष्ट्रप्रेम अन् अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होईल, अशा गोष्टींचे वाचन केल्यामुळे त्यांच्यातील राष्ट्रप्रेम जागृत झाले. त्यांनी अन्यायी मोगलांना पायबंद घातला.
काल्पनिक आणि खोट्या गोष्टींमुळे विकृती बळावणे : सध्या मुले ‘टॉम अँड जेरी’ यांसारख्या काल्पनिक आणि खोट्या गोष्टी वाचतात अन् ऐकतात. त्यामुळे मुले कल्पनेच्या जगतात वावरतात. त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान असे गुण निर्माण होत नाहीत. पर्यायाने ती मनाने दुर्बळ होतात.
मुलांनो, मला सांगा की, आपल्याला रामायण, महाभारत यांमधील वास्तव गोष्टी समजून घेऊन शिवरायांसारखे राष्ट्रप्रेमी व्हायला आवडेल कि ‘टॉम अँड जेरी’सारख्या काल्पनिक गोष्टी पाहून मनाने दुर्बळ व्हायला आवडेल ? शिवरायांना सांगूया की, आम्हाला आपल्यासारखे होऊन आदर्श राज्य घडवायचे आहे, यासाठी आम्ही आजपासून वास्तव गोष्टी ऐकू आणि वाचू.

आई-वडिलांना नमस्कार करणे

उद्धटपणा टाळून विनम्रता जोपासणे : शिवाजी महाराज प्रतिदिन आईला नतमस्तक होऊन नमस्कार करत. त्यामुळे त्यांच्यात ‘विनम्रता’ हा गुण आपोआपच आला. जिथे नम्रता असते, तिथेच सरस्वती वास करते; म्हणून त्यांनी अनेक कला आत्मसात केल्या होत्या.
आपल्याला शिवरायांसारखे व्हायचे असेल, तर आपण प्रतिदिन आपल्या आई-वडिलांना नमस्कार करायला हवा. सध्या काही मुले आपल्या आईशी उद्धटपणे बोलतात. त्यामुळे आपल्यात विनम्रता कशी येणार ? आपण शिवरायांना सांगायला हवे, ‘महाराज, आपले गुण आम्ही विसरलो. आम्हाला क्षमा करा. आम्ही आजपासून प्रतिदिन आईला नमस्कार करू आणि आमच्यात ‘नम्रता’ हा गुण आणू.’ मित्रांनो, असे कराल ना ? असे करणे हीच खरी शिवजयंती आहे.

योग्य आदर्श ठरवणे

राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवणे : शिवरायांचे आदर्श होते, राम आणि कृष्ण. मुलांचे जसे आदर्श असतात, तशी मुले घडतात. आपले आदर्श चांगले असतील, तर आपणसुद्धा तसेच घडू. आपल्या जीवनाचा योग्य आदर्श ठरवणे फार महत्त्वाचे आहे.
चित्रपटातील नायकांचा आदर्श ठेवणे सर्वथा अयोग्य : सध्या चित्रपटातील एखादा नायक, उदा. सलमान, शाहरुख, तसेच ब्रुस ली, रॉक असे मुलांचे आदर्श असतात. मित्रांनो, आदर्शाप्रमाणे ती व्यक्ती घडत असते. वरील आदर्शांमध्ये कोणता गुण आहे की, जो राष्ट्र आणि समाज यांना हितकर आहे ? मित्रांनो, हे पडद्यावर खोटे नाटक करतात; पण त्यांचे वास्तवातील वर्तन आदर्श नसते.
आपण आपला आदर्श असा ठरवावा की, ज्याच्यात सर्व गुण आहेत. जो जसा बोलतो, तसा वागतो. मित्रांनो, शिवाजी महाराज असेच होते; म्हणून त्यांनाच आपला आदर्श म्हणून मानूया.

उपासना

कुलदेवतेची उपासना करणे : उपासना हा शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्राण होता. ते प्रतिदिन आपल्या कुलदेवतेचा नामजप आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करत. ‘राष्ट्र हेच माझे कुटुंब आहे’, असे शिवराय मानत असल्याने श्री भवानीमातेने त्यांना तलवार दिली होती.
उपासनेला महत्त्व न देणे : सध्या मुले उपासनेला महत्त्व देत नाहीत. पर्यायाने त्यांच्या जीवनात निर्भयता, आनंद, तसेच मनात व्यापक विचार येत नाहीत. मुले ‘शुभं करोति’ म्हणणे, तसेच नामजपाला बसणे इत्यादी गोष्टी टाळतात. त्या वेळेत कार्टून, विकृत चित्रपट किंवा मालिका पहातात.
उपासनेला पर्याय नसल्याने आजपासून आपण उपासना करण्याचा निश्चय करूया. तेच शिवाजी महाराजांना आवडेल आणि खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी केली, असे होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करावयाची प्रतिज्ञा

१. मी प्रतिदिन कुलदेवतेचा नामजप करीन आणि ‘माझे राष्ट्र आदर्श व्हावे’, अशी प्रार्थना करीन.
२. रामायण, महाभारत यांमधील गोष्टी वाचीन.
३. प्रतिदिन आईला नमस्कार करीन.
४. छ. शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून पाहीन.
५. दूरदर्शनवरील राष्ट्रप्रेम जागृत करणार्‍या मालिका, उदा. छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी इत्यादी पाहीन आणि ‘राष्ट्र माझे कुटुंब आहे’, असा विचार करीन.
६. मित्रांना वाढदिवसाची भेट म्हणून शिवरायांचे चित्र देईन.
७. शिवरायांच्या बालपणीच्या शौर्यकथा वाचीन.
८. स्वसंरक्षणासाठी कराटे किंवा लाठीकाठी यांचे प्रशिक्षण घेईन.
९. प्रतिदिन ‘बालसंस्कार डॉट कॉम’ पाहीन.

चला मित्रांनो, खालील गोष्टी टाळूया आणि राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध होण्याचे छ. शिवाजी महाराजांना वचन देऊया !

१. मी आईशी उद्धटपणे बोलणार नाही.
२. इंग्रजांसारखा पेहराव परिधान करणार नाही.
३. ‘शेकहँड’ करणार नाही.
३. मी आजपासून कार्टून पहाणार नाही.
४. संगणकावर विकृत खेळ खेळणार नाही.
मित्रांनो, आजपासून वरील प्रत्येक कृती आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केल्यास खरी शिवजयंती साजरी केल्याप्रमाणे होईल. हे सर्व कृतीत आणले, तर शिवरायांना अपेक्षित असे आदर्श राज्य निर्माण होईल.
आमच्या वास्तव स्थितीची आम्हाला जाणीव करून दिली आणि उपाय सांगितले, यासाठी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. ‘हे भवानीमाते, आम्हा सर्वांना हे कृतीत आणण्याची शक्ती आणि बुद्धी दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’

Sunday, 26 January 2020

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती

26 January Republic Day

२६ जानेवारी!!! प्रजासत्ताक दिन    आज आपण सर्वजण आपल्या भारत देशाचा ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. आपणा सगळयांकरता हा शुभदिन एक आनंद पर्वणी असते. महाविद्यालयं, शाळा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसोबतच संपुर्ण देशभर आजचा हा दिवस साजरा होत असतो.

हा दिवस आपण का साजरा करतो? याची कल्पना सर्वांनाच आहे तरी देखील या दिनाच्या निमित्ताने ही एक आठवण.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती – 26 January Republic Day
बरं का मंडळी! संविधान समितीने भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्विकृत केले आणि पुढे १९५० साली २६ जानेवारी या दिवशी पासुन भारतीय संविधानाला अमलांत आणण्यात आले.

       भारताच्या संविधानाला संविधान समितीव्दारे तयार करण्यात आले होते. हे संविधान तयार करण्याकरीता तब्बल २ वर्ष, ११ महीने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्याकरीता २९ ऑगस्ट १९४७ या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती.

मंडळी आपल्याला तर माहीतच भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७  या दिवशी मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० ला आपला देश संविधान स्विकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक सार्वभौमिक, आणि गणराज्य बनला.

    भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1930 साली 26 जानेवारी ला लाहोर येथे जे अधिवेशन झाले त्यात आपला तिरंगा ध्वज फडकवुन संपुर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.
त्याचे स्मरण म्हणुन हा दिवस राज्यघटना अमलांत आणण्याकरता निश्चित करण्यात आला.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात – Republic day Celebration
२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे राजपथावरून एका मोठया परेडचे आयोजन करण्यात येते. रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन या राजपथावरून या पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. हे पथसंचलन “याची देही याची डोळा” या ओळींप्रमाणे डोळयांचे अक्षरशः पारणे फेडते.
या पथसंचलनापुर्वी भारताचे प्रधानमंत्री ‘अमर जवान ज्योती’ या सैनिकांकरता बनविल्या गेलेल्या स्मारकाजवळ जावुन तेथे पुष्पचक्र अर्पण करतात. भारत देशाकरीता ज्या विरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अश्या सैनिकांचे यावेळी स्मरण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते.

त्यानंतर प्रधानमंत्री आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भेटी घेतात. राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुण्यांसोबत आगमन होते. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि राष्ट्रगीत सुरू होते. या प्रसंगी 21 तोफांची सलामी देण्यात येते. विर सैनिकांना अशोक चक्र आणि किर्ती चक्र हे पुरस्कार दिले जातात.

अतुलनिय शौर्य गाजवलेल्या बालविरांची या संचलनात मिरवणुक काढली जाते. २६ जानेवारी चे औचित्य साधत परराष्ट्रातील राष्ट्राध्यक्षांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्या जाते.

बरं का मंडळी! आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंन्द्र प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीमधे १९५० ला दिल्लीतील राजपथावर पथसंचलन आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या भारत देशाचे जे महत्वाचे वैशिष्टय आहे ते म्हणजे ’विविधतेतुन एकता’ त्या गोष्टीला या पथसंचलनातुन मानवंदना देण्यात आली होती.

आज आपल्या भारत देशाची गणना शक्तिशाली देशांमध्ये करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या या औचित्याने आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायला हव्या व आपल्या राष्ट्राच्या विकासाकरता आणि समृध्दीकरता परमेश्वराजवळ प्रार्थना करायला हवी की आम्ही आमच्या देशाला विश्वातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्यात यशस्वी होऊ! जय हिंद ! ! ! !

Sunday, 22 December 2019

राष्ट्रीय गणित दिवस


श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०)
 भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशीगणिती सूत्रे लिहून टाकत.या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात तिरोड या गावी झाला.
वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले.
त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला.
त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला.
१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती.त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते.लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले.
१९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले.त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.


Tuesday, 22 October 2019

इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं .

इयत्ता ४ थीत असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली .

पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते .

इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं .

शौर्य , धैर्य , बुध्दिमत्ता , चातुर्य , लढाऊपणा , सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पाना पानावर ओसंडून वाहत होतं .

शिवरायांचे बालपण , शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो , रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा होण्याची इच्छा व्हायची.

अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेली मगरमिठी आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या .

आगऱ्याच्या दरबारातील स्वाभिमानाची फोडलेली डरकाळी, औरंगजेबाच्या हातावर तुरी, वाचताना रक्त सळसळून उठायचं.

गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या .......
त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले .

याच पुस्तकाने शिवचरित्रावरील अभ्यासाची पहिल्यांदा गोडी लावली ,
ज्याने पहिल्यांदा महाराज ,
हिन्दवी स्वराज्य ,
 मावळे ,
 बाजी ,
तानाजी
शिवराज्याभिषेक
 या साऱ्यांची पहिली ओळख ज्या पुस्तकाने करुन दिली ते इयत्ता चौथीचं पुस्तक आजही हातात घ्यावसं वाटतं .

इतिहासाची आणखी कोणतीही पुस्तके वाचली तरी या पुस्तकाचं स्थान सर्वोच्च राहिल.

#शिवराय_म्हणजेच_इतिहास
#शिवराय_म्हणजेच_भविष्य

जय भवानी🚩 
    जय जिजाऊ🚩
     जय शहाजीराजे🚩
              जय शिवराय🚩     
                    जय शंभूराजे🚩

Monday, 2 September 2019

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।

गणेश चतुर्थी के पावन महापर्व  पर आपको सपरिवार हार्दिक शुभकामनाएँ

जीने की चाहत रखते हो तो,
कुछ करने की फ़ितरत,
क्यों नहीं है नसों में।

ऊपर वाले को बहुत है कोसा,
पर वह जूनून क्यों नहीं है रगों में।

जवां हो थक गए हो क्यों,
दुनिया की रियावतो से,
खुद के अंदर झाँक के देखो,
भरे हुए हो शिकायतों से।

जोश है जो भी तुममे वो मंद पड़ा है,
गैरत मंदी की बुनियादो पे तो,
 तुम्हारा स्वाभिमान खड़ा है।

खून जम गया है क्या जो बिखरे हो,
छोटी बातों में,
कहने को तो हैं बातें कई,
 पर क्यो उलझे हो जज्बातो मेँ।

कदर करो इस जिंदगी की,
जो मिलती है एक बार,
तुम्हारा किया वापस आएगा तुमपे,
सही करो या बनो गुनाहगार।

फिर भी मन ना भरे तो झांक लो,
 उन बूढ़ी आँखों में,
साँसे दीं जिन्होंने,
क्या देख सकते हैं,
 तुम्हें वो इन हालातो में।

जिंदगी हर किसी की,
 खुशकिस्मत नहीं होती,
कहीं होतें हैं उजाले तो,
कही रंगत नहीं होती।

जिंदगी को अक्सर,
मरम्मत की आरज़ू होती है,
बुलंद इरादे वालो की पूरी,
 हर जुस्तजू होती है।

नाकामी की चादर में लिपटे,
अरमानो को भी सांस चाहिये,
हौसलों से केवल कुछ न होगा,
 तुम्हारे अंदर भी एक आग चाहिये।


Tuesday, 20 August 2019

*पैसा फार काही आहे पण सर्वच पैसा नाही जिवनात आंनदासाठी काहीही होऊ द्या. फक्त हसत रहा!!

*देश्यात चार  वाईट घटनांनी खळबळ उडाली*

१)  १२००० कोटीची रेमंड कंपनीचा मालक नालायक मुला मुळे भाड्याच्या घरात राहत आहे.
२)  करोडपती महिला मुबंईच्या पाँश एरीयात आपल्या करोंडोच्या फ्लँट मध्ये मृत्यु होऊन फक्त सांगाडा राहीला...परदेश्यात फार मोठी नौकरी करणारा करोडपती मुलाला माहीती सुध्दा नाही की, आपली आई कधी देवा घरी गेली.
३)  स्वप्न खरे केलेला आई.ए. एस.या पदावर बक्सरच्या कलेक्टरने तणावामुळे आत्महत्या केली.
४. राष्ट्रिय संत भेयुजी महाराजाची गोळी झाडून आत्महत्या
....या चार घटना दाखवितात की, जिवनात पद, पैसा,व प्रतिष्ठा हे काही कामाचे नाही...जर आपल्या जिवनात सुख, समाधान व नातेवाईक नसतील तर पद,पैसा , प्रतिष्ठा उपयोगाची नाही.
नाही तर एका कलेक्टरला काय गरज होती आत्महत्या करण्याची.
सुख पैश्यांनी मिळत नाही, तर आपल्या माणसांकडुन मिळत असते.

*पैसा फार काही आहे पण सर्वच पैसा नाही.*

जिवनात आंनदासाठी काहीही होऊ द्या. फक्त हसत रहा!!
इग्रजी वर्ण आपणास शिकवतात... 

A B C...
Avoid Boring Company
कंटाळवाण्या व्यक्ती पासुन दुर रहा.

D E F...
Don'tEntertain Fools
मुर्खांवर आपला वेळ वाया घालवु नका.

G H I...
Go For High Ideas
उंच विचार ठेवा.

J K L M...
Just Keep a Friend like Me
माझ्या सारखे मित्र ठेवा.

N O P...
Never Overlook the Poor n Suffering
गरीब व पिडीतांना दुर्लक्षीत करु नका.

Q R S...
Quit Reacting to Silly tales
मुर्खांना प्रतिक्रीया देऊ नका.

T U V...
Tune Urself for our Victory
स्वत:चा विजय निश्चीत करा.

WXYZ...
We Xpect You to Zoom ahead in life
आम्ही आपणाकडुन जिवनात पुढेच रहाल अशी आपेक्षा करतो.

जीवनात आमचा नेहमी उद्देश असला पाहीजे

९ - ग्लास पाणी
८ - तास झोप
७- परीवारा सोबत यात्रा
६- व्यक्ती चे कूटुंब
५- दिवस आठवड्यातुन काम
४- शुद्ध विचारांची चौकट
३- बेडरुमचा फ्लँट
२- सुंदर मुले
१- सहचरणी
०- चिंता.!!!

हा फक्त मेसेज नाही,

एक शिकवण आहे

*आवडले तर आपल्या मीत्रांना शेर करा*

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

  Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Frien...